भांबुर्डीच्या रुद्राक्षला वर्ल्ड कप एअर रायफलमध्ये सुवर्णपदक
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी हे गाव जेमतेम पाचेक हजार लोकसंख्या असलेले खेडे गाव! परंतु या गावानं जगाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांत नाव कोरलेलं आहे.या अगोदर अधिकारी व डॉक्टर म्हणून नावाजलेले गाव,शेती क्षेत्रात अग्रेसर असलेले ,पशुपालन व दुग्धव्यवसाय यात अग्रेसर ,एकमेकांचे पाय न ओढता पुढे जाणाऱ्यांना मदत करून सहकार्य करणारे गाव अशी ख्याती असणारे गाव!
सूल,जर्मनी येथे ९ मेपासून सुरू असलेल्या नेमबाजी स्पर्धेत दि.११ रोजी कनिष्ठ गटात रुद्राक्ष बाळासाहेब पाटील यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकाऊन आपल्या गावाची मान उंचावली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या स्पर्धेमध्ये जगातले ५० पेक्षा अधिक देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत .
रुद्राक्ष हा आयपीएस अधिकारी, ठाणे शहरचे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब वाघमोडे यांचा मुलगा आहे. बाळासाहेब वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्यातच सोय उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूनं माळशिरस तालुक्यातील २८८ अधिकारी एकत्रित करून ज्ञानसेतू या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका उभा करून माळशिरस तालुक्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन भरमसाठ फी भरणे, राहण्याची सोय जेवणाची सोय शक्य नसल्याने तसेच ग्रामीण भागातील मुलींना अतिशय उपयुक्त असल्याने ज्ञानदानाचा सेतू उभा करून ‘आम्ही अधिकारी झालो, तुम्ही पण अधिकारी व्हा’ असा जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.
बाळासाहेब वाघमोडे हे गरीबीचे चटके घेत शिक्षण घेऊन उच्च पदावर अधिकारी झालेत. बरेच वेळा असं घडतं की पुढे जाणारा मागच्याचा विचार कधीच करत नाही, परंतु बाळासाहेब वाघमोडे हे अतिशय प्रामाणिकपणाने,जिद्ध, चिकाटी आणि सरळमार्गी राहून, घर, गाव व तालुक्यातील सर्वांना उदात्त हेतूने मदत करत आहेत.

संबंधित बातम्या
गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा
तळेवाडी-आटपाडीच्या भाऊ-बहिणीची गरुडभरारी !
माडग्याळ मेंढीस जी.आय.मानांकन मिळण्याचा मार्ग मोकळा