दिघंचीत पद्मिनी फार्मसी कॉलेजमध्ये बी.फार्मसीच्या फॅसिलिटेशन सेंटरला मान्यता!

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ दिघंची:

दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्था दिघंची संचलित, पद्मिनी कॉलेज ऑफ फार्मसी दिघंची ता.आटपाडी जि.सांगली या महाविद्यालयातील बी.फार्मसी या कोर्ससाठी स्टेट सीईटी सेल (State Cet Cell)मुंबई यांच्यामार्फत Facilitation Center ( FC 6923)स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे.
हे सेंटर सुरू झाल्याने ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना registration, form filling, verification, confirmation याची सोय होणार आहे.दिघंची परिसरातील विद्यार्थी व पालक वर्गातून याचे कौतुक होत आहे.
ही मान्यता मिळाल्याने संस्थेचे संस्थापक ईश्वरतात्या मोरे -पाटील, संस्थेच्या संचालिका सौ. स्वातीताई मोरे- पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अमित पानसकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.