रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती) :
अमरावती तालुक्यातील शिराळा येथील महम्मद अदनान मुर्तुजा मो.मुकरम या विद्यार्थ्याला सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परिक्षेत ७२० पैकी ६४७ गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळविले.
शिराळा येथील सेवानिवृत्त प्रा.मोहम्मद मुकरम यांचा मुलगा आहे. नीट परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून शिराळा गावाचे नाव उज्वल केले. पॅराडाईज कॉलनी अमरावती येथे राहणारा शिराळा येथील मो. अदनान मुर्तुजा मो मुकरम याला एम बी बी एस व्हायचं आहे. आपल्या यशाचे श्रेय आई , वडील व गुरुजनांंना देतो. त्याला दहावी मध्ये 95 टक्के तर बारावीमध्ये 96 टक्के गुण मिळाले होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश