आटपाडीत विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसंदर्भात अधिकारी व मुख्याध्यापक यांची बैठक संपन्न
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी तालुक्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालय यामधील प्राचार्य,मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांची बैठक घेण्यात आली.
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे दाखले विद्यार्थ्यांना शाळेतच मिळावेत या प्रामाणिक आणि उदात्त हेतूने प्रांताधिकारी यांनी ही तातडीची बैठक बोलवली होती. बैठकीस शिक्षण विभागाचे ज्येष्ठ विस्ताराधिकारी अशोक म्हेत्रे, समग्र शिक्षा अभियानकडील लेखा अधिकारी प्रशांत चंदनशिवे यांनी सुरुवातीला मुख्याध्यापक व शाळा स्तरावर विविध दाखले काढणेबाबत शाळानिहाय आढावा घेतला व शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले मिळावेत यासाठी मुख्याध्यापकसुद्धा आग्रही असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांनी दाखले काढणेसंदर्भात विविध पातळीवर महसूल विभागामार्फत येणाऱ्या अडचणी संदर्भात ग्रामस्तरावर तलाठी तसेच सर्कल ऑफिसर यांना योग्य त्या सूचना देणार असल्याचे नमूद केले.
प्रांताधिकारी यांनी आटपाडी,खानापूर तालुक्यात रहिवासी असणाऱ्या व सदर विविध दाखल्यांकरिता शंभर टक्के पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के लाभ देण्याचे आवाहन मुख्याध्यापकांनी पेलावे व त्यादृष्टीने शाळास्तरावर पालक सभा घेण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश