माळशिरसकरांच्या विकासकामात नेहमी सोबत राहणार – आमदार रोहितदादा पवार

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये पाण्याचा प्रश्न शासकीय जमिनीचा व इतर विकास कामांसाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असताना माळशिरसकरांच्या विकासकामात नेहमी सोबत राहणार असल्याचे सांगून ईडीचे मुख्य प्रवर्तक किरीट सोमय्या यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या शिक्षण संस्था, सुमित्रा पतसंस्था, कारखाना,सुतगिरण अशा अनेक संस्थांकडे लक्ष द्यावे, काहीतरी धागेदोरे हाताला लागतील असा खोचक सवाल कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित दादा पवार यांनी माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर उत्तमराव जानकर, तुकाराम देशमुख, बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे, सुरेश पालवे पाटील, धैर्यशील देशमुख, ऋतुजाताई मोरे बाळासाहेब धाईंजे, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, शिवसेना तालुकाप्रमुख नामदेव वाघमारे, बाबासाहेब माने, विकास धाईंजे, माजी नगरसेवक भगवानराव थोरात, सुरेश वाघमोडे, अण्णासो शिंदे,उद्योजक सचिनआप्पा वावरे, अजय सकट, किरण साठे, प्राध्यापक धनंजय साठे, रमेश पाटील, मच्छिंद्र गोरड, अशोकराव देशमुख, सोमनाथ पिसे, अनिल सावंत, दत्तात्रय मगर, महादेव बंडगर, अश्विनी भानवसे, तुकाराम ठवरे, सचिन देशमुख टी. डी. देशमुख आदी मान्यवरांसह माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.