मंत्री नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा.

माळशिरसमध्ये भाजपातर्फे पुतळ्याला ‘जोडे मारो आंदोलन’ व निवेदन
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी माळशिरस येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नवाब मलिक यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो आंदोलन’ व तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मंत्री नवाब मलिक यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत आर्थिक गैरव्यवहार स्पष्टपणे उघड होत आहेत. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींंकडून जमीन स्वस्तात विकत घेतली, मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. कुर्ल्यातील एलसीबी रोडवरील जागे शिवाय मलिकानी अन्य चार ठिकाणी स्वस्त जमिनी खरेदी केलेल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढे उग्र आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रताप पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, संघटन सरचिटणीस संजय देशमुख,सरचिटणीस संदीप घाडगे, दत्तात्रय भिलारे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दादासाहेब खरात, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने,डॉ.अक्षय वायकर, महादेव कावळे, चिटणीस सुनील बनकर, चिटणीस हनुमंत कर्चे, हनुमंत दुधाळ, हनुमंत सरगर, संतोष महामुनी, राजेंद्र वळकुदे, नागेश भोसले, रशीद मुलानी,सचिन रणवरे, केशव कदम, कांताआबा मगर आदी उपस्थित होते.अनुचित प्रकार घडू नये म्हणून माळशिरसचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.