नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आटपाडी या संस्थेचे मुख्य विश्वस्त प्रा.अजित चव्हाण यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून साकार झालेली आर्थिकदृष्ट्या मागासलेला व शिक्षणाची आवड असणारा विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये,म्हणून या संस्थेने दत्तक पालक ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा उपक्रम तालुक्यात प्रथमच हाती घेतला. त्यात या संस्थेच्या चारही शाखेत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अजित चव्हाण यांनी दिली.
पिंपरी हायस्कूल पिंपरी खुर्द मध्ये या योजनेअंतर्गत गरीब,होतकरु, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ४८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व शालेय गणवेशाचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी पिंपरी हायस्कूल पिंपरी खुर्दचे मुख्याध्यापक एस.एम.पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून आजचे शिक्षण व त्यासंबंधी योजनेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमासाठी लिगाडेवाडी गावचे दिनकर भोसले (आबा )कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आर.पी.पाटील यांनी केले.
या कार्यक्रमावेळी लवटे ,पाटील, कोळवले आदि शिक्षक व सूर्यवंशी, पुजारी, भोसले या शिक्षीका, विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेजाळ यांनी केले. आभार जाधव यांनी मानले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश