नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
आटपाडी तालुका शारीरिक शिक्षण संघटनेची सहविचार सभा माडगुळे येथील ग.दि.माडगूळकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाली.
सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष जनार्धन झेंडे,सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने, डीटीएफ संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, कवठेमंकाळ तालुका क्रिडा समन्वयक परशुराम लोंढे, तासगाव तालुका क्रिडा समन्वयक शहाजी खरमाटे, माण तालुका यशवंतराव चव्हाण हायस्कूल वरकुटे -मलवडी हायस्कूलचे क्रीडाशिक्षक संजय जगताप, प्रसाद विभुते व आटपाडी तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात आटपाडी तालुका क्रीडा समन्वयक ए.जी.पाटील यांची ग.दि.माडगूळकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज माडगुळे या विद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष जनार्दन झेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शारीरिक शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांच्या अडचणींवर चर्चा केली. शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तत्पर राहू, अशी ग्वाही दिली.
आटपाडी तालुका शारीरिक शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिघंची हायस्कूल दिघंचीचे क्रीडा शिक्षक प्रदीप देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन दिघंची हायस्कूल दिघंचीचे क्रीडा शिक्षक एस.एस.गायकवाड यांनी केले.अनुमोदन एकता मोरे-पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज क्रीडाशिक्षक अमोल वसेकर यांनी केले.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक