अनिल मदनेः
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत/शिराळा :
आरळा ( ता. शिराळा ) येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कॅरम प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.
डोंगरी,दुर्गम,जंगली भागातील विद्यार्थ्यांना कॅरम खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने विद्यालयात कॅरम प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॅरमचे क्रीडा प्रशिक्षक मोहसीन नदाफ म्हणाले, जगभरातील अनेक देशात हा खेळ खेळला जात असून शासकिय शालेय क्रीडा स्पर्धेमध्येही या खेळाचा समावेश आहे.मानसिक ताणतणाव,थकवा घालविण्यासाठी उपयुक्त असणारा हा खेळ मनाची एकाग्रता वाढवणारा आहे.नोकर भरतीसाठीही हा खेळ फायदेशीर असून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खेळात सहभागी होऊन करिअर घडवावे,असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह कॅरमचे नियम,स्पर्धां गट इत्यादी माहिती सांगण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.यावेळी कॅरमचे राष्ट्रीय खेळाडू संकल्प कांबळे,साहिल बागल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख सुधीर बंडगर यांनी केले.ए.डी.भाष्टे यांनी सूत्रसंचालन केले. आर.एम.पाटील यांनी आभार मानले.आर.डी.देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी सर्वं विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मंचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक