नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
रशिया येथे झालेल्या रशियन ओपन तायक्वांदो स्पर्धेत आटपाडी तालुक्यातील गौरव भाट या विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल मिळवत आटपाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
आटपाडीच्या मातीतून तयार झालेली खेळाडू, कलाकार, साहित्यिक आदि क्षेत्रात नावाजलेली अनेक नावे आहेत. गौरवने रशियन तायक्वांदो स्पर्धा जिंकून आमच्या अशा वाढवल्या आहेत,असं मत व्यक्त करीत युवानायक अनिलशेठ पाटील यांनी त्याचा सत्कार केला व त्याला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या भागातील तरुणांनीही अशाच पद्धतीने खिलाडूवृत्तीने आपल्या भागाचे नाव करावे आणि आपल्या आटपाडीची नवी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा अनिलशेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रशिक्षक नाथा पवार,शहाजी मगर,यलाप्पा पवार,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गौरव भाट हा विद्यार्थी गेली अनेक वर्षे तायक्वांदो स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहे.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक