जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,मुख्याध्यापक सुनिल साळे यांचा सत्कार

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा पडोळकरवाडी या शाळेचा ‘स्वच्छ सुंदर’ शाळा म्हणून मंगळवेढा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल साळे यांचा जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भारत क्षीरसागर यांनी सत्कार केला.त्याचबरोबर माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना भारत क्षीरसागर म्हणाले की,आठ एकर परिसरात शाळा इमारत व हजारो वृक्ष लागवड करून येथे नंदनवन फुलवले आहे. शाळा सजावट,परसबाग, दत्त मंदिर, शाहूमहाराज रंगमंच, औषधी बाग व इतर अनेक उपक्रम राबविले आहेत.या शाळेचा आदर्श घेऊन इतर शाळांनीही हे उपक्रम राबवावेत.
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले,
मुख्याध्यापक सुनिल साळे यांनी अतिशय कष्टाने स्वतःचे पैसे खर्च करून शाळा नावारूपाला आणली आहे.यामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचाही वाटा आहे.या सर्वांचे पेढे वाटून कौतुक केले.भविष्यात जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.माझ्याकडून सर्व प्रकारची मदत मिळेल.
मुख्याध्यापक सुनील साळे म्हणाले,मी, माझे सर्व शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने शाळा स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे.यापुढेही मी विविध स्पर्धेत शाळेला बक्षीस मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आभार चव्हाण यांनी मानले.यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे पदधिकारी अशोक मुचंडी, कोळी, पत्रकार मारुती मदने, संतोष पोरे,मोरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.