
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आटपाडी या संस्थेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माडगुळे येथे ग दि माडगूळकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गरजू, गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट (शालेय गणवेश ,स्कूल बॅग ,वही, कंपास पेटी) वाटप करण्यात आले.
दत्तक पालक योजना प्रायोगिक तत्त्वावर या संस्थेने राबवली.या योजनेत तालुक्यातील,तालुक्याबाहेरील बर्याचशा दात्यांनी देणगी स्वरुपात देणगी देऊन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. या संस्थेने राबवलेल्या या योजनेच्या शालेय किट वाटपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा.टी.ए.चव्हाण होते.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून आजचे शिक्षण व त्यासंबंधी योजनेचे महत्त्व सांगितले.बाबुराव विभुते (दादा ) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.य.पा.वाडीचे संदीप गायकवाड यांच्या मातोश्री सिंधुताई गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून लाभले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक ए.जी.पाटील यांनी केले. तर एस.एन.गायकवाड,एच.डी.चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांदणे यांनी केले. आभार प्राध्यापक वाय.डी.चव्हाण यांनी मानले.
या संस्थेचे मुख्य विश्वस्त अजित चव्हाण यांच्या कल्पनेतून साकार झालेली दत्तक पालक योजना खऱ्या अर्थाने यशस्वी झाली.ही योजना संस्थेच्या चारीही शाखेत राबवली जाणार आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश