
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय १६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगली अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षातील एन.सी.सी.प्रथम वर्षाकरिता निवड चाचणी भरती प्रक्रिया पार पडली.
या निवड चाचणीकरिता ११ वी ते पदवीपर्यंतच्या सुमारे दोनशे मुले व मुली यांनी सहभाग घेतला.१६ महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया संपन्न झाली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ.विजय लोंढे यांनी सर्वांचे स्वागत केले.
एन.सी.सी.निवड भरती प्रक्रियेमध्ये मुले व मुली यांची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली.यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चांगला प्रतिसाद नोंदविला.प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे नूतन एन.सी.सी. अधिकारी प्रा.विजय शिंदे तसेच द्वितीय व तृतीय वर्षातील एन.सी.सी.कॅडेटस यांनी भरतीप्रक्रियेचे संपूर्ण संयोजन केले. महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी तसेच भवानी विद्यालयाचे एन.सी.सी.अधिकारी रामचंद्र जाधव व कॅडेटस यांनी बहुमोल सहकार्य केले.
या संपूर्ण भरतीप्रक्रियेचे काम १६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.सांगलीचे अधिकारी विठ्ठल गड,विनोद पाठक, बाबूराव पवार व प्रकाश जाधव यांनी पार पाडले.यावेळी भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश नामदास, दिघंची हायस्कूलचे एन.सी.सी.अधिकारी डी.एम.पाटील उपस्थित होते.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश