सिद्धनाथ येथे मुला-मुलींच्या धावण्याच्या स्पर्धा संपन्न

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे फौजी ग्रुप व डिफेन्स करिअर अकॅडमीच्या वतीने मुले व मुलींसाठी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे उदघाटन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिद्धनाथचे सरपंच भीमराव माने, माजी सरपंच राजेंद्र चव्हाण, नानासाहेब गोपने , ग्रामसेवक तुकाराम जावीर, पोलीस पाटील पोपट चव्हाण, सचिन घेरडे उपस्थित होते.
स्पर्धेत मुलाच्या गटात प्रविण कांबळे याने प्रथम, पवन आलदार याने दुसरा, रणजित गडदे याने तिसरा क्रमांक मिळविला.मुलीच्या गटात साक्षी सरगर हिने प्रथम, मोहिनी इसापुरे हिने द्वितीय, चैत्राली चव्हाण हिने तिसरा क्रमांक पटकाविला.
उदघाटनपर भाषणात बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, सिद्धनाथ सारख्या ग्रामीण भागात फौजी ग्रुप व डिफेन्स करिअर अकॅडमीने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धा विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरू शकतात. पोलीस, सैन्य दलात भरती होण्यासाठी या स्पर्धा आवश्यक आहेत. ग्रामीण भागातील सामाजिक संस्थेने अशा स्पर्धेचे आयोजन करावे असे आवाहन केले.