जत तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक संपन्न

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी आयोजित केली. या बैठकीमध्ये शिक्षकांच्या अडी-अडचणी तसेच शाळांबाबतीत काही प्रश्न उपस्थित केले.
यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले.वरिष्ठ वेतन श्रेणी,सेवा पुस्तके अद्यावत करणे,शालेय विद्युतीकरण,शाळा किरकोळ दुरुस्ती व मोठी दुरुस्ती,आदर्श शिक्षक पुरस्कार,रुग्ण कल्याण समितीवर प्राथमिक शिक्षकांचा सदस्य घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणे,शंभर टक्के शाळा भरवणे व शाळांच्या वेळाबाबत ही चर्चा करण्यात आली. आयकर व सी एम पी प्रणाली संदर्भातही चर्चा करण्यात आली व त्यावर योग्य तो मार्ग काढण्याचे ठरले.गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे सांगितले.
यावेळी विस्तार अधिकारी तानाजी गवारे,सुखदेव वायदंडे,लिपिक व कर्मचारी युनियनचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजू कांबळे,लिपिक व कर्मचारी युनियनचे तालुका अध्यक्ष संतोष गुरव, बीआरसीचे तज्ञ मार्गदर्शक सुरेंद्र सरनाईक,मुल्ला व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.