
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत (जि.सांगली) येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक विजय तिकोटी यांना मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद,नवी दिल्ली,भारत यांच्याकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ‘क्रीडाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क
अनेक क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व नाट्यगृह ,मिरज येथे पार पडला.राष्ट्रीय कराटे क्रीडा प्रशिक्षक तिकोटी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पालकमंत्री जयंतराव पाटील ,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज,शहर जिल्हा अध्यक्ष (राष्ट्रवादी युवक काँग्रेस) राहुल पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कारचे मानकरी ठरलेल्या सर्वांचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
जत येथे शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धांना सुरुवात
निंबवडे प्रीमियर लीग पर्व सहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न
राष्ट्रीय नेमबाजीत भांबुर्डीच्या रुद्राक्षला सुवर्णपदक