
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संख येथे रविवार दि.२६ रोजी सायंकाळी ४ वा.भव्य शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील ,आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल (दादा) पाटील, सांगली शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये जत तालुक्यातील विविध पक्षांचे पदधिकारी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. तरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांना उपस्थित रहावे असे आवाहन जत तालुका अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याअध्यक्ष सुजय (नाना) शिंदे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन