
भाजपला खिंडार पाडून पदाधिकऱ्यांची ‘रासप’मध्ये एंट्री!
‘गाव तिथे रासप’ची शाखा अभियानास सुरवात- माऊली सलगर
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत येथे भाजपचे तालुका कोषाध्यक्ष प्रा.बंडू डोंबाळे व त्याच्या सहकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.
जत येथील रासपची तालुका बैठक व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर(माऊली) सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजितराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष शाहिदभाई मुलाणी, सोलापूरचे जिल्ह्याचे नेते आबासाहेब मोटे, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, माजी जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकिल नगारजी, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरक यांची प्रमुख उपस्थिती होती.भाजपचे हिवरे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कचरे, बंडु चौगुले, सागर माने, सोसायटी सदस्य संतोष माने, बाजचे युवक नेते विकास फोंडे, अंकलेचे अतुल पिंगळे, हिवरेचे अजित भंडे, दशरथ डोंबाळे, पृथ्वीराज डोंबाळे, आप्पासाहेब बंडगर, गणेश कचरे, समाधान कचरे, पोपट कचरे, विश्वास सोलंकर, नाना सोलंकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी हिवरेचे प्रा.बंडू डोंबाळे यांची जत तालुका अध्यक्षपदी, वळसंगचे विठ्ठल पुजारी यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी, कोसारीचे किसन टेंगले यांची सांगली जिल्हा सरचिटणीसपदी, निगडी बुद्रुकचे पांडुरंग धडस यांची जत तालुका युवक अध्यक्षपदी, संखचे रमेश कोळी यांची जत तालुका युवक उपाध्यक्ष पदी व बालगांवचे शिवानंद माने यांची जत तालुका युवक संघटकपदी निवड जाहिर करण्यात आली.
सलगर म्हणाले,पश्चिम महाराष्ट्रामध्ये रासपच्या एक हजार शाखा डिसेंबरअखेर उभा करण्याचा संकल्प केला असून त्यामध्ये जत तालुका आग्रेसर राहील यात शंका नाही.भविष्यातील सर्व निवडणूका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत. त्याची सुरुवात आतापासूनच गाफील न राहता करा, असे आवाहन केले.
पाटील म्हणाले, जत तालुक्यामधून रासपचा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यच काय तर आमदारही निवडून आणायचा आहे.त्यासाठी सर्वजण एकसंघ होऊन कामाला लागू,असे आवाहन केले.
जत तालुका नूतन अध्यक्ष प्रा.बंडू डोंबाळे म्हणाले, जत तालुका रासपमय करून दाखवू.तालुक्यामध्ये महादेव जानकर यांना मानणारा वर्ग मोठा असून त्या सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात तालुक्यात गावागावात शाखा निर्माण करु.
शाहिदभाई मुलाणी,आप्पासाहेब थोरात,मारुती सरगर, अकिल नगारजी, किसन टेंगले, भूषण काळगी, संभाजी टेंगले, विश्वास निळे, बंडू चौगुले, लक्ष्मण पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रासप नेते रामचंद्र मदने, बसवंत हिरवे, ओकार बंडगर, मधूकर काळे, अमोल कुलाळ, विकास म्हारनूर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन