
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू गोरड यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती अध्यासी अधिकारी संदिप चव्हाण यांनी दिली. सरपंच बायडाबाई गोरड यांनी राजीनामा दिल्यामुळे गोरडवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे रिक्त होते. त्यासाठी निवडणुक निर्णायक अधिकारी यांनी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यामध्ये सरपंच पदासाठी विष्णू गोरड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडीच्या वेळी अध्यासी अधिकारी संदिप चव्हाण, सहाय्यक म्हणून तलाठी दिग्विजय शहा, ग्रामसेवक रविंद्र पवार यांनी काम पाहिले.
गोरडवाडी गावातील गोरड व हुलगे या दोन्हीही गटाचे पाच वर्षाचे सरपंचपदाच्या कालावधीचे नियोजन ठरलेले आहे.त्याप्रमाणे सरपंच बायडाबाई गोरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंचपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज सकाळी १० ते १२ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, १२ ते १ नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी १ ते २ होती. यावेळी सरपंच पदासाठी विष्णू गोरड यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी २ वाजता अध्यासी अधिकारी यांनी विष्णू गोरड यांना सरपंच म्हणून घोषित केले .

गोरडवाडी ग्रामपंचायतीचे ११ सदस्य
वार्ड क्र.१ : बायडाबाई पांडुरंग गोरड,मेघाराणी संदीपान कर्णवर
वार्ड क्र.२ : विष्णू नाना गोरड, मैनाबाई दिपक गोरड, जयश्री माणिक कोकरे
वार्ड क्र.३ : विजय निवृत्ती गोरड, ताई शंकर यमगर, ज्योती नवनाथ केंगार
वार्ड क्र.४ : पांडुरंग किसन पिसे, पुनम मच्छिद्र गोरड, मुगाबाई आज्ञान गोरड
गोरडवाडी येथे नेतेमंडळी व पार्टी प्रमुख यांची बैठक होऊन सरपंच पदासाठी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली.त्यामध्ये युवा नेते विष्णूभाऊ गोरड यांची चिट्ठी निघालेली असल्याने गोरडवाडी गावच्या सरपंच पदी युवकाला पहिल्यांदा संधी मिळाली आहे.
तालुक्यातील अनेक दिग्गजांनी लावली हजेरी
राजेवाडी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, माजी उपसभापती किशोर सुळ, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बाबा माने, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे यांनी नूतन सरपंच विष्णू गोरड यांचा सन्मान केला.
यावेळी भिकाजी गोरड, नाना हुलगे, बाळासाहेब गोरड, रामचंद्र गोरड,संतोष देशमुख, अमोल कोळेकर, राजु गोरे, राजेंद्र कोळेकर, बापु गोरड, लक्ष्मण गोरड , भागवत कर्णवर – पाटील, अजिनाथ कर्णवर, हनुमंत गोरड, संतोष गोरड, दिपक गोरड, मच्छिद्र गोरड, खंडू कळसुले, इजिनेअर अजय गोरड, रावसाहेब गोरड, संदिपान कर्णवर, राजेंद्र गोरड, ददासाहेब हुलगे जगन्नाथ गोरड, आबा गोरड, तायाप्पा गोरड,उत्तम गोरड,पोलीस पाटील नानासाहेब यमगर, नवनाथ केंगार, संजय कोळेकर, अभिनेता बिरा गोरड , गणेशराजे कोकरे, वैभव पुजारी, कैलास यमगर , भारत सरगर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी याकुब शिकलगार,आब्दुल शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते. निवड झाल्यानंतर फटक्याची आतषबाजी, हालग्यांचा कडकडाट व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला.


संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन