
स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचे शिक्षक व्ही.बी.काटे यांचा उपक्रम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /पावस:
रत्नागिरी तालुक्यातील पावसच्या स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरचे सहा.शिक्षक काटे व्ही.बी यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सहज आणि सोप्या पद्धतीने शिकता यावा या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी इंग्रजी विषयाचे १०० शैक्षणिक व्हिडिओ तयार केलेले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात असा प्रयोग करणारे पहिले शिक्षक आहेत.वर्गात फळ्यावर जसे शिकविले जाते त्याच पध्दतीनं घरी स्वत असे व्हिडिओ तयार केलेले आहेत.
गेली दाेन वर्षे काेविड १९ या महामारी साथ आजाराचे सर्व जागांवर संकट आलेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शाळा बंद व शिक्षण चालू या बाबी लक्षात घेऊन ऑनलाईन व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना लिंकद्वारे या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्रजी विषयाचा अभ्यास व्हावा या उद्देशाने यासाठी इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी पर्यंतचे इंग्रजी विषयाचे पूर्ण धड्यावर आधारित व इंग्रजी ग्रामर व स्टोरी रायटिंगसह लेटर रायटिंग निबंध अॅप्रिसिएशन इ तब्बल १०० शैक्षणिक व्हिडिओ तयार केलेले आहेत Dr.Vasantrao Kate यानावाने स्वत:चे युट्यूब चॅनेल तयार करून स्वत:च्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. याचा महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.यापुढेही असे अनेक इंग्रजीचे विषयाचे व्हिडिओ तयार केले जाणार आहेत.तरी विद्यार्थ्यांनी https://youtube.com/channel/UCfF4lS4EMSf2KrIWRN4BM6A ही लिंक ओपन करून संबंधित व्हीडिओ पहावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश