मनसे सर्व निवडणुका स्वबळावर लढणार :जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

मनसे येणाऱ्या नगरपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिली.
माळशिरस तालुका आढावा बैठकीसाठी आले होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मनसेचे माढा लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने, तालुका उपाध्यक्ष बाबा ननावरे,तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख फिरोज शेख, तालुका संघटक अजित पवार, अकलुज शहराध्यक्ष सुदाम आवारे,माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, नातेपुते शहराध्यक्ष रवी काळे, माळशिरस शहर कार्याध्यक्ष भाऊसाहेब टेळे, डॉ.विजय दीक्षित,निवृत्ती टेळे, राजाभाऊ काशीद, सनी गुरव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.