
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
वंचित बहुजन आघाडीच्या आटपाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी गायगवाळे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच बूथनिहाय पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करणेच्या सूचना दिल्या. ओबीसी आरक्षण तिढा सुटेल कि नाही हे नक्की नसलेने ओबीसींना फक्त वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणताही पक्ष संधी देऊच शकत नाही,त्यामुळे तमाम ओबीसी कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीत सन्मानाने दाखल होण्याचे आवाहन गायगवाळे यांनी केले.
साहेबराव चंदनशिवे यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कोणत्याही क्षणी सामोरे जाण्याची आटपाडी तालुक्याची तयारी असलेचे सांगितले.
यावेळी संतोष वाघमारे, स्वाती सवणे, राखीताई खरात, रोहन भिसे, राहुल साबळे, दिपक चंदनशिवे, बाबासो काटे, शैलेंद्र आयवळे, सौरभ वाघमारे, अतुल वाघमारे, विनोद पवार, किरण खरात, सुनंदा मोरे, उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन