
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटकपदी संतोष गोरड यांची निवड करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील गोरड यांना लहान वयामध्ये नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली असून त्यांची निवड उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आली. विकास सेवा सोसायटीचे काम पारदर्शक बजावलेले माजी चेअरमन संतोष अज्ञान गोरड यांची ही निवड करण्यात आली .
शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात पक्ष वाढवण्यासाठी काम करु,राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटक पदाची जबाबदारी दिलेली आहे, ती मी प्रामाणिकपणाने पूर्ण करेन.पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या हाताला काम मिळवून देईन, तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यास आम्ही प्रयत्न करु, असे संतोष गोरड यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन