जीवामृत देणार शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीपासून जीवदान

श्री.शंकर महाराज कृषी महाविद्यालय,पिंपळखुटा येथील विद्यार्थाचा उपक्रम
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूरबाजार( अमरावती):

संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय,पिंपळखुटा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु.ज्ञानेश्वरी राजेंद्र भस्मे हिने ग्रामीण कृषी कार्यनुभव या उपक्रमातर्गत शेतक-यांना जिवामृत कसे तयार करायचे? आणि ते शेतीसाठी कसे फायदेशीर आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू अंत्यत महत्वाची भूमिका निभावतात.त्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी जीवामृत यांचा वापर करुन पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. पिकांना रोगापासून दूर ठेवते व उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.खत तयार करण्यासाठी कमी खर्च येतो.
जीवामृत तयार करणे सोपी पध्दत असून यात गोमुत्र, गाईचे शेण,गूळ,बेसन,माती यांचे मिश्रण एकजीव करुन प्लास्टिकच्या ड्रममध्ये दोन ते तीन दिवस ठेवून त्यानंतर पिकाना द्यावे.
या कार्यात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.यु.पाटील,डॉ.शरद नायक व पवन चिमोटे यांनी मोलाचे सहकार्य केले.आजही अनेक शेतकरी नैसर्गिक शेती करुन अधिक उत्पादन घेत आहेत.शास्वत उत्पादनासाठी शेतक-यांनी जैविक शेतीकडे वळणे गरजेचे आहे,असे शेतक-यांना पटवून दिले.