आटपाडी जिप गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उद्या बैठक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवार दि.८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली आहे. कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब(काका) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख उद्घाटक आहेत.
माजी सभापती व ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील,कन्नूर जिल्हा गोल्ड व सिल्व्हर रिफायनरी केरळचे अध्यक्ष विकासराव कदम, पंचायत समिती सदस्या उषाताई कुटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.एन.पी.खरजे प्रमुख पाहुणे आहेत.
माजी उपसरपंच विलासराव नांगरे-पाटील,माजी अध्यक्ष आनंदराव पाटील, कॉन्ट्रॅक्टर शहाजी पाटील, माजी अध्यक्ष विष्णुपंत पाटील, युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.अनिता पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ.अश्विनी कासार,हिंदी भाषा सेलचे तालुकाध्यक्ष एस.एल.पाटील, प्रदेश प्रतिनिधी भाऊसाहेब देशमुख, कामगार सेलचे तालुकाध्यक्ष अनिल ऐवळे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष दिनकर करांडे, शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील, सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत,डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. तुषार पवार,माजी चेअरमन गोविंदराव कदम, तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर, कृषी सेलचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब बुरुंगले, सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष किशोर गायकवाड,पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष हणमंतराव चव्हाण,तालुका उपाध्यक्ष शशिकांत भोसले, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे,वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष प्रा.संताजी देशमुख, हणमंत सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व आटपाडी जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते,तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार आहे.