खेळाडूंचे प्रश्न क्रिडामंत्री यांच्याबरोबर चर्चा करून निकाली काढू:जयंतरावजी पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ मुंबई: 

दि.१७ जून रोजी मंत्रालय मुंबई  येथे क्रिडा क्षेत्राला मजबुती देण्यासाठी व खेळाडूंच्य़ा भविष्यासाठी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रा.प्रविण गावडे, प्रा.नारायण खरजे व शिष्टमंडळाने विविध मागण्या करण्यात आल्या.  विविध क्रिडा क्षेत्रातले ज्वलंत प्रश्न व विषयांवर निवेदनाद्वारे चर्चा केली.यावेळी उपस्थित प्रा.नारायण खरजे(प्रदेश सचिव युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व शिष्टमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नेहमी क्रिडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राज्य ठरले आहे. कोव्हीड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर गेली दोन वर्षे खेळाडूंचे, क्रिडा क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात क्रिडा क्षेत्रात देशामध्ये महाराष्ट्राला अग्रेसर राहायचे असेल तर खालील मागण्या निकाली काढण्याची त्यांनी मागणी केली.१. महाराष्ट्राचा स्वतंत्र राज्य क्रिडा महोत्सव आयोजित करावा.२. प्रत्येक आमदार फंडातून विधानसभा क्षेत्रात किमान एक स्पर्धा आयोजित करावी.३. राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना सकस आहार व अनुदान मिळावे.४. कोव्हीड-१९ मुळे सर्व वयोगटातील राहिलेल्या स्पर्धा पुन्हा घेण्यात याव्यात.५. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील खुल्या जागा क्रिडा संस्थेला उपलब्ध करुन द्याव्यात.६. क्रिडा संस्थांना पायाभूत सुविधा व अनुदान देण्यात यावे.७. शिवछत्रपती पुरस्कार त्वरित वितरित करावा.८. प्रत्येक तालुक्यात क्रिडा पुरस्कार देण्यात यावेत. या सर्व मागण्यांसाठी संबंधित मंत्री व विभागाची त्वरित बैठक आयोजित करून सर्व प्रश्न निकाली काढावेत अशी मागणी केली.