

जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना निवेदन- प्रा.नारायण खरजे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:
मुंबई येथे सांगली,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील विकेंद्रीत,दुर्लक्षित,वंचित गावांना टेंभू,म्हैशाळ, उरमोडी,ताकारी योजनेमध्ये समावेश करणेसाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना प्रा.नारायण खरजे व शिष्टमंडळ यांनी विनंती केली.
आटपाडी तालुक्यातील १६ गावे, माण तालुक्यातील विरळी(बारावाड्या), कुरणवाडी,शेनवडी यासारखी बरीच गावे संबंधित अधिकारी यांच्याकडून घ्यावीत. यावेळी वाड्या-खेड्यातील, वस्तीवरील शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, अशी विनंती केली.यावेळी प्रा.यशपाल भिंगे,सामाजिक नेते उल्हासशेठ धायगुडे, प्रवक्त्या कु. प्रियदर्शिनी ताई कोकरे, विवेक कोकरे, काकासाहेब मारकड, समाजसेवक अशोक वाघमोडे, कु.भारतरत्न कोकरे, आदि पदाधिकारी आणि शिष्टमंडळ उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन