

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील कण्हेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये नामदेव माने यांची बिनविरोध निवड झाली.
सन २०१८ मध्ये झालेल्या कण्हेर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य गौतम माने याच्या पॅनलचा पराभव करून विरोधी मोहिते-पाटील पॅनलचे १३ पैकी ११ सदस्य व सुनंदा माने सरपंचपदी निवडून आल्या होत्या. बैठकीत उपसरपंच करण्याचे ठरल्याप्रमाणे राजेंद्र गोसावी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी कन्हेर ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये नामदेव माने यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याची निवडणूक अधिकारी कोंडगुळे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी हनुमंत वगरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.संरपंच सुनंदा माने यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, धर्मराज माने, माजी सरपंच तानाजी माने, धनाजी माने, माजी उपसरपंच शिवदास सरगर, नामदेव बर्वे, पोपट माने, बबन माने, नारायण माने, युवराज पाटील, गणेश माने, ग्रामपंचायत सदस्य परशुराम मिसाळ, दत्ता माने, राजेंद्र गोसावी, सौ.सोनल माने, सौ.गोरी देवकते, लहु जाधव, लक्ष्मण राजगुरु, आंनदा माने, मधुकर बोडरे, बंडु पाटील, संभाजी माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कण्हेर नगरीमध्ये भव्य मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना उपसरपंच नामदेव माने म्हणाले की, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हेर गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन