राष्ट्रवादीचे कृषी सेलचे तालुकाध्यक्ष बुरुंगले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

आटपाडी तालुक्यातील प्रमुख नेते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कृषी सेलच्या अध्यक्षपदी बनपुरी गावचे तात्यासाहेब बुरुंगले यांची निवड झाली.त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते बुरुंगले यांचा सत्कार करण्यात आला.
भिवघाट-हिवरे मार्गावर राष्ट्रवादीचे नेते बबनराव हसबे यांच्या पेट्रोल पंपावर भेट देण्यासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील आले होते.यावेळी आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते रावसाहेब काका पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख,जेष्ठ नेते व माजी सभापती विजयसिंह पाटील, आटपाडीचे माजी उपसरपंच विलासराव नांगरे-पाटील, यपावाडी येथील माजी सरपंच विष्णुपंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील, कामतचे सरपंच परशुराम सरक, नितीन डांगे,समाधान भोसले, खरसुंडीचे विजय पुजारी, नवनाथ डांगे, रमेश पवार, सागर डोईफोडे यावेळी उपस्थित होते.