“बाबा! तू काळजी घे”

“इथं काय चालतं,ते मला सगळं माहीत आहे”: पालकमंत्री भरणेमामा
बाबासाहेब माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 737 रक्तदात्याने केले रक्तदान
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन सद्या देशात ,राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाशी सामना करताना लोकांना रक्ताची गरज भासते . रक्ताअभावी लोकांना प्राण गमावण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माळशिरस तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी “अर्चना मंगल कार्यालय माळशिरस” येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.तसेच प्रत्येक रक्तदात्यास विशेष भेटवस्तू देण्यात आली. अधिकाधिक कार्यकर्त्यांनी येऊन रक्तदान करावे असे आव्हान करण्यात आले होते.या शिबिरात 737 रक्तदात्यांनी केले रक्तदान .
शिबीराचे उदघाटन हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के.इनामदार, व माढा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,सांगोल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे, मा.आमदार रामहरी रुपनवर, नेते उत्तमराव जानकर, फत्तेसिंह माने पाटील ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजकुमार हिवरकर,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रा. धनाजी साठे,तुकाभाऊ देशमुख ,गणेश पाटील , डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील ,विकास धांईजे , डॉ. रामदास देशमुख , रमेश पाटील ,भानुदास सालगुडे पाटील ,मच्छिंद्र ठवरे ,उमेश पाटील ,सुरेश पालवे ,किशोर सुळ ,धैर्यशील देशमुख ,पांडुरंग देशमुख , ॲड.सोमनाथ वाघमोडे ,माऊली पाटील ,रणजीत जाधव ,अजय सकट ,गौतम आबा माने ,ऋतुजा मोरे ,कीर्ती पालवे ,पांडुरंग वाघमोडे ,बाजीराव माने ,जयवंत पालवे ,आप्पासाहेब(मारुती)देशमुख ,पांडुरंग तात्या वाघमोडे ,विकास बंडगर ,बबन पालवे ,रावसाहेब पांढरे ,बाळासाहेब धांईजे ,उमाजी मिसाळ ,सुभाष माने , पोपट माने , अशोक देशमुख, पांडुरंग पिसे ,विष्णू गोरड ,खंडू कळसुले ,शामराव बंडगर सह विविध पक्षाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते
अक्षय ब्लड बँक माळशिरस यांचे ब्लड गोळा करून साठवण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले.तसेच गौतम माने मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले .
“सद्या कोरोनाने थैमान घातले असून कोरोना झालेल्या लोकांना रक्ताची गरज असते.जर अशी रक्तदान शिबीरे आयोजित केली गेली, तर रक्ताचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे रक्ताअभावी कोणाला जीव गमवावा लागणार नाही.”
डॉ.एम.के.इनामदार, हृदयरोग तज्ञ


“
बाबा!तू काळजी घे,गट-तट सगळं बाजूला ठेऊन काम कर!” या शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांना शुभेच्छा दिल्या.
भरणे पुढे बोलताना म्हणाले की,ज्या पक्षाने व नेत्याने जबाबदारी दिली आहे,कोण कुठला गट तट विसरून सर्वाना सोबत घेऊन प्रत्येक गावात राष्ट्रवादीची शाखा कशी जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे.महाविकास आघाडीचे काम हे प्रत्येक गावागावात कसे पोहचेल याची खबरदारी बाबासाहेब माने यांनी घ्यावी. माळशिरस तालुका हा राष्ट्रवादी (महाविकास आघाडी) कडे आहे,त्यामुळे येथे प्रत्येक युवकाने हा मतदारसंघ आपल्याकडे राहण्यासाठी प्रयत्न करावा.यापुढे भरणेमामा उत्तमराव जानकर यांना उद्देशून म्हणाले की,चेअरमनसाहेब ‘तुम्ही सगळेजण खूप नशीबवान आहात.कारण माळशिरसची लोकं खूप चांगली आहेत.माळशिरस तालुका मला माहित आहे,आपल्यामध्ये फक्त नदीच आहे.इथं काय चालते ते मला सगळं माहीत आहे. फक्त मी काही बोलत नाही’ या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.