जतमध्ये रिपाइंत ‘इन्कमिंग फ्लो’ वाढला!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाची बैठक आज पंचायत समिती विश्रामगृह जत येथे पार पडली. तालुक्यातील व शहरातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाची रणनीती व ध्येयधोरणे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगितली.
यावेळी जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे युवक मोहसीन इनामदार व इरफान उगारे यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.संजय कांबळे यांनी पक्षात प्रवेश दिल्याचे जाहीर करून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी, डॉक्टर, नर्स व यामधील काम करणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणींवर इनामदार व उगारे यांना सोबत घेऊन या क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष कायमस्वरूपी राहील असे जाहीर केले. प्रवेश केलेल्या नेत्यांना रिपाइंमध्ये सन्माननीय जबाबदारीचे पद दिले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण, युवा जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. हेमंत चौगुले, तालुका सरचिटणीस प्रशांत ऐवळे, विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे, तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे, तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे, शिकंदर पटाईत, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.