
…बिळातून बाहेर कधीच येऊ दिले जाणार नाही: भाजपा नेते जयवंतराव सरगर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात शेतकर्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन एकदाही तोडू दिले नाही. शेतकऱ्यांना लाईट बिल भरा म्हणून दबाव आणला नाही. असे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व शेतकऱ्यांचा कैवारी व त्यांचे हाल समजून घेणारा, शेतकऱ्यांचा वाली, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
परंतु आता या “तीन तिघाड काम बिघाड” या सरकारमध्ये किंग मेकर व तथाकथित जाणता राजा म्हणवणारे नेते, आता शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे,पीक जोमात आले आहे, परंतु विज नसल्याने पाणी देता येत नाही. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी शेंदून काढायला लागत आहे.
आज आपण एकविसाव्या शतकात असून देखील शेतकऱ्यांना इ.स. सतराव्या शतकात असणाऱ्या पणजोबा, खापर पणजोबा, त्यांचे आजोबा पणजोबा यांच्या पिढ्या आठवायला लागल्या आहेत. एवढी वाईट महाराष्ट्रातील शेतकरी बांधवावर वेळ आलेली आहे.
आणि अशा परिस्थितीत स्वतःला तथाकथित जाणता राजा समजणारा नेता आता कुठे लपून बसला आहे? लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय द्या, लवकरात लवकर शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज कनेक्शन जोडून द्यावेत अन्यथा बिळात लपून बसलेल्या तथा कथित जाणता राजाला बिळातून बाहेर कधीच येऊ दिले जाणार नाही, असे भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन