जतमध्ये शिक्षक संघ- थोरात गटाच्या अध्यक्षांंसह ५० जणांची समितीत ‘एंन्ट्री’ !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
जत तालुका शिक्षक संघ थोरात गटाचे अध्यक्ष प्रमोद कोडग, नेते उद्धव शिंदे, राहुल टकले , अजीम नदाफ यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी आज शिक्षक समितीत बिनशर्त जाहीर प्रवेश केला असल्याची माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव यांनी दिली.
राज्यनेते विश्वनाथ मिरजकर अण्णा ,राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी.जाधव, व्हा.चेअरमन राजाराम सावंत, डॉ.आंबेडकर फुले शाहू सह रुग्णालयाचे चेअरमन राजेंद कांबळे , माजी चेअरमन सुनिल गुरव, संचालक शाशिकांत बजबळे, रमेश पाटील, बाळासाहेब आडके,जिल्हा कायध्यक्ष सतिष पाटील , जिल्हा कोषाध्यक्ष माणिक पाटील, नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत शिक्षक समितीच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा बिनशर्त जाहीर प्रवेश केला.
यावेळी थोरात गट शिक्षक संघातून प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना व महिलांना उचित सन्मान केला जाईल असे प्रतिपादन राज्य नेते विश्वनाथ मिरजकर अण्णा यांनी केले.
यावेळी बोलताना प्रमोद कोडग यांनी शिक्षक संघात सुरु असलेल्या एकाधिकारशाहीला कंटाळून व शिक्षक समितीत सामान्य कार्यकर्त्यांचा उचित सन्मान होतो हे बघीतल्याने आम्ही प्रवेश केला.
शिक्षक नेते उद्धव शिंदे यांनी कोरोनासारख्या महामारीत सामाजिक जाणिवेतून शिक्षक समितीने डॉ. आंबेडकर शाहू फुले रुग्णालयाचे मोठे काम उभे केले असून लोकशाही पद्धतीने चालणारी संघटना असल्याने आम्ही प्रवेश केला आहे.
अजीम नाथा नदाफ व राहुल टकले यांनी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची दखल शिक्षक समितीशिवाय कोणी घेऊ शकत नाही, यावर आमचा विश्वास बसलेने आम्ही आज प्रवेश केला आहे. भविष्यकाळात जत तालुक्यात शिक्षक समितीचे जाळे भक्कमपणे उभे करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू असे त्यांनी सांगितले.