‘घड्याळाचा काटा’ काढून प्रा.हेमंत चौगुले यांनी ‘फिरविले रिपाईंचे चक्र’!

“कामाला लागा” : विवेकजी कांबळे
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रदेश सचिव सांगली,मिरज,कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेकजी कांबळे पक्ष वाढ व कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जत दौऱ्यावर आले होते.पंचायत समितीच्या विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जत शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रा.हेमंत चौगुले यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, जिल्हा सरचिटणीस अरुण आठवले, विजय कांबळे, पंकज कांबळे, विद्यार्थी परिषदेचे जत तालुका अध्यक्ष सुभाषदादा कांबळे, रिपाईचे तालुका सरचिटणीस प्रशांत ऐवळे, आदि रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेले प्रा.हेमंत चौगुले यांची रिपाई युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी निवडीचे पत्र या कार्यक्रमात देण्यात आले.
आगामी जत नगरपरिषद निवडणूक तसेच जत तालुक्यातील म्हैशाल पाणी व तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयावर विवेक कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यापुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद निवडणूक नेटाने लढवण्यासाठी सज्ज राहण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला. जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणेबाबत मार्गदर्शन केले. येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आत्तापासूनच जोरदार तयारीला लागण्याच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्या.