सचिन वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
जेऊर येथील मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक विशाल राजकुमार कांबळे यांनी व्ही. आर. के. फिल्म प्रोडक्शन निर्मित “अधुरी सुहागरात” या हिंदी वेबसीरीज मध्ये नव्याने पदार्पण केले.
या वेबसीरीजचे दिग्दर्शक अक्षय सुतार आहेत. भावनिकतेपेक्षा आशय महत्त्वाचा आहे असे मत लेखक श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. या वेबसीरीजचे उद्घाटन पोपट कांबळे व विशाल राजकुमार कांबळे यांनी केले. यावेळी कॅमेरामन गणेश पवार, साउंड रेकॉर्डिंस्ट सुरज पात्रो उपस्थित होते.
या वेबसीरीजमध्ये कलाकार रेखा सरकार, अजयकुमार,पोपट कांबळे , संदेश साबळे, विभुती, महेश महाळसेकर, भगवंत घुंबाडे, विकास कसबे यांचा समावेश आहे . या वेबसीरीजचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर पोपट कांबळे व किशोर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले .
तसेच या शुटसाठी अथक परिश्रम राजकुमार कांबळे आणि संग्राम सरवदे यांनी घेतले. लोकेशन द अविस् विलेज रिसोर्ट कर्जत (लोणावळा) येथे वेबसीरीजचे शुटींग पूर्ण झाले असून या वेबसीरीजचे नेट प्राईम या ओटीटी चॅनेलवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु