अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
आजच्या एकविसाव्या शतकात सोशल मीडिया हे असे एक माध्यम झाले आहे की, एखादी गोष्ट किंवा एखादा व्हिडिओ रातोरात प्रसिद्धीस मिळताना दिसून येत आहे. आता हेच बघा, अवघ्या मागील दोन ते तीन दिवसात ‘ओ शेठ! तुम्ही नादच केलाय थेट!’ हे गीत प्रसिद्ध झाले असून अवघ्या काही तासातच तरुण तरुणी, वयस्कर, अगदी लहान मुलांच्या मनात घर करून बसले आहे. प्रत्येकाने या गाण्याविषयी आपली क्रेझ निर्माण केली आहे.
तरुण असो किंवा वयस्कर असो, ज्याने-त्याने आपला एखाद्या फोटोस या गाण्याचे एडिटिंग करून या गाण्याला पसंती दिलेली दिसून येत आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये या गाण्याची क्रेझ जास्तच वाढत असलेली दिसून येत आहे. अगदी हिरो-हिरोईनचे फोटोसुद्धा या गाण्याला अपवाद ठरलेले नाहीत.
अगदी डाळिंबावर येणाऱ्या तेल्या रोगाला सुद्धा या गाण्याने सोडलेले दिसुन येत नाही. तसेच इंधन दरवाढीमुळे पेट्रोल डिझेलचा दर वापरून देशाचे पंतप्रधान मोदीसुद्धा या सोशल मीडियावर या गाण्याने जास्त प्रमाणात व्हायरल झालेले दिसून येत आहे.
सध्या आपल्या या आधुनिक जीवनात अँड्रॉइड मोबाईलचा वापर सर्वांकडे आहे. या गाण्याची सर्वांमध्ये एवढी मोठी क्रेझ निर्माण झाली आहे की, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सर्वांच्या स्टेटसवर हे गाणं वाजू लागल्याने, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत हे गाणं सर्वांच्या पसंतीस उतरलेले आहे.
एकंदरीत सोशल मीडियावर हे गाणं खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने सध्याच्या या धकाधकीच्या व संसर्गजन्य कोरोनाच्या या जीवनात या गाण्याने सर्वांचे मनोरंजन मात्र नक्कीच केलेलं दिसून येत आहे.

संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु