स्कॉलरशिपचे अर्ज भरण्यास मुदतवाढ!

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ: सहायक आयुक्त संभाजी पोवार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी सन 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्याकामी दि. 5 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर, नोटीस बोर्डवर पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज रजिस्ट्रेशन करुन घेण्याबाबत सुचना निर्गमित कराव्यात. सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/ फ्रीशिप/ RSMS/ निर्वाह भत्ता या योजनांच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरावेत. याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोवार यांनी केले आहे.