विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्याची सक्ती करू नका अन्यथा आंदोलन करू: रावसाहेब हेगडे
सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी :
गेली दोन वर्षे कोरोना या महाभयानक विषाणुचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.या महामारीच्या काळात शाळा,महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी सक्तीने वसुली करू नये, असे आवाहन अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे जत तालुकाध्यक्ष रावसाहेब राजाराम हेगडे यांनी केले आहे.सक्तीने फी वसुली केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.
गेली दोन वर्षे राज्यात कोरोना संकट सुरू आहे .यामुळे गेली दोन वर्षे शाळा,महाविद्यालये बंद आहेत. पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व परिक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. सध्या महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरू असताना ते इतर फीची सक्तीने वसुली करत आहेत. जागतिक संकटात सर्वच समाज भरडून गेला असताना ज्या सुविधांचा विद्यार्थी लाभ घेत नाहीत, ती फी सक्तीने वसुली करणे अत्यंत अन्यायकारक आहे.
सध्या शाळा महाविद्यालयात परीक्षा फार्म भरून घेण्याची लगभग सुरू असून हे फार्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व फी भरा अन्यथा परीक्षा फार्म भरून घेतला जाणार नाही,अशी सक्ती करत आहेत.अशी सक्ती कोणीही करू शकत नाहीत.विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. असे जर कोणत्या शाळा, महाविद्यालयात होत असेल तर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष रावसाहेब राजाराम हेगडे यांनी दिला आहे. मिडीयाशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही लवकरच संबंधित वरिष्ठांना निवेदन देऊन या सर्व मनमानी कारभाराची चौकशी करणार आहोत.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश