माळशिरस तालुक्यात श्रीनाथ विद्यालयाचे वर्चस्व!

श्रीनाथ विद्यालयाच्या मुली तालुक्यात प्रथम
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या विद्यालयाने इयत्ता बारावीच्या निकालात माळशिरस तालुक्यात वर्चस्व निर्माण केले आहे.
विज्ञान शाखेत –
प्रथम आर्या घाटे व ईशा शिंदे (99.16)
द्वितीय अभिषेक झिंजे (97.83)
तृतीय टिशा वाघमोडे (97.66)
वाणिज्य शाखेत –
प्रथम राहुल खरात (91.16)
द्वितीय अशोक कांबळे (90.00)
तृतीय ओंकार सपताळे (86.05)
कला शाखेत –
प्रथम शशिकांत सोनटक्के (86.66)
द्वितीय पुनम मेटकरी (84.16)
तृतीय पांडुरंग जानकर (82.05)
यावेळी एकूण 105 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असून सर्व विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणी (75% च्या पुढे) मिळाली असून सर्वांनी घवघवीत यश मिळवले.
विद्यालयाने दहावी व बारावी १०० % निकालाची परंपरा कायम ठेवत गरुड भरारी घेतली.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करणे व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, प्राचार्य योगेश गुजरे व शिक्षक नेहमीच सतर्क असतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना एक समृद्ध अन् सदृढ नागरिक बनविण्याचा प्रयत्न असतो.