प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पुणे :
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा सन २०२१ चा निकाल शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर हा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येणार आहे. यासाठी मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे. http://result.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
असा पाहता येईल वेबसाईटवर निकाल:
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- www.maharashtraeduction.कॉम
▪️निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जाईल.
▪️ त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
▪️ त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
▪️त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
▪️ समजा तुमचा सीट नंबर D123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव अश्विनी असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात D123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच उदा: ASHWINI नाव असेल तर ASH असे लिहावे लागेल.
▪️यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश