५० पॉझिटिव्ह, ३८ कोरोनामुक्त !

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.०८/०७/२०२१

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. ०८ जुलै रोजी नव्याने ५० लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ३६ पुरुष असून १४ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ४२ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ४६ व तालुक्याबाहेरील ४ व्यक्तींचा समावेश आहे. 

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांच्याद्वारे रात्रंदिवस संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा  घालण्याचे काम सुरू आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.०८ जुलै,२०२१)

आटपाडी 8
बोंबेवाडी 2
वाक्षेवाडी 1
जांभुळणी 3
देशमुखवाडी 8
पिंपरी खु. 2
लेंगरेवाडी 2
यपावाडी 1
पुजारवाडी(दि) 2
दिघंची 1
गळवेवाडी 1
उंबरगाव 1
गोमेवाडी 2
नेलकरंजी 6
कटरेवाडी/घाणंद 1
खरसुंडी 4
वलवण 1
कोळा 1
नाझरे 1
पाचेगाव 1
खानापूर 1