
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
दिघंची येथील कुबेर जावीर यांच्या अविष्कार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचा कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला. काजल पालसंडे हिने १०० पैकी ९९ गुण मिळवून सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
दिघंची येथील शासनमान्य अविष्कार कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मार्च २०२१ मध्ये झालेल्या कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत काजल सिद्धनाथ पालसांडे हिने इंग्रजी 30 विषयांमध्ये १०० पैकी ९९ गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.सानिका सोमनाथ पालसंडे हिने ९६ गुण मिळवून दुसरा क्रमांक व राहुल बाळकृष्ण मेटकरी याने ९५ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.ऑब्जेक्टिव्ह विभागांमध्ये काजल पालसांडे व राहुल मेटकरी यांनी ५० पैकी ५० गुण मिळवले.तसेच स्पीड पॅसेजमध्ये स्वप्नील चंद्रकांत खटके व चेतन अशोक गवळी यांनी २० पैकी २० गुण मिळवले.
मराठी ३० विषयांमध्ये शांता सदाशिव केंगार हिने ८४ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच स्पीड पॅसेज विभागांमध्ये ऋषिकेश रमेश चोथे याने २० पैकी २० गुण मिळवले.
हिंदी ३० विषयांमध्ये विशाल दामोदर गुळिग याने १०० पैकी ९० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
इंग्रजी 40 विषयांमध्ये स्वप्नील चंद्रकांत खटके याने ८३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. स्पीड पॅसेज या विभागात त्याने २० पैकी २० गुण मिळवले. मराठी ४० विषयांमध्ये सदिच्छा तुकाराम जावीर हिने ७९ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
दरवर्षीप्रमाणे याही सत्रात सर्व उत्कृष्ट निकालाची परंपरा अबाधित ठेवत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अविष्कार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे प्राचार्य कुबेर जावीर व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सागर हेगडे यांनी अभिनंदन केले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश