आमदार गोपीचंद पडळकर यांचे शिष्टमंडळास आश्वासन
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेकविध प्रश्न शासन दरबारी अनेक वर्षे झाले तरी तसेच प्रलंबित आहेत .प्राथमिक शिक्षक हे वाड्या वस्तीपासून दुर्गम भागात प्रामाणिक सेवा बजावत असतात .त्यांच्या न्याय्य मागण्या अधिवेशनात मांडून वाचा फोडणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवेदन स्वीकारताना दिले.
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना 1986 प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आवाज उठवू .तसेच राज्यात 2001 पासून शिक्षक भरती करताना शिक्षण सेवक पद निर्माण करून तुटपुंज्या मानधनावर वेठबिगार्यासारखी शिक्षकांना वागणूक मिळत असून त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्याचा अध्यापनावर परिणाम होत आहे व सध्या ते मानधन केवळ ६००० रुपये एवढे आहे. ते २५००० रुपये करावे अशी मागणी शिक्षक समितीच्या वतीने आमदार पडळकर यांच्याकडे निवेदनात करण्यात आली .
विदर्भ मराठवाडा येथील शिक्षक बांधव महाराष्ट्रात सेच पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षक बांधव कोकणपट्ट्यातील दुर्गम भागात नोकरी करत आहेत. त्यामुळे हे शिक्षण सेवकांच्या तुटपुंज्या मानधनात भरघोस वाढ करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले .शिवाय विद्यार्थी उपस्थिती भत्ता गेले पंचवीस वर्षे झाली प्रति विद्यार्थी प्रति दिवस १ रुपयाच आहे. त्यात वाढ करण्यासाठी पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.
हे निवेदन देताना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी .जाधव, आटपाडी पंचायत समितीचे सभापती जयवंत भाऊ सरगर ,तालुकाध्यक्ष श्यामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड , हैबतराव पावणे, नानासाहेब झुरे , जयंत देठे, युवा नेते चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश