प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत मिळावेत: प्राचार्य डॉ.डी.के.महाडीक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:
पदवी- पदविका अभियांत्रिकी २०२१-२२ या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी-विद्यार्थीनींना लागणारे सर्व दाखले त्वरित उपलब्ध करून द्यावेत, यासाठी आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय विटाचे प्राचार्य डॉ.डी.के. महाडीक, टी.पी.ओ.प्रा.नारायण खरजे यांनी विट्याचे तहसिलदार शेळके यांना निवेदन दिले.
मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी हवे असणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने बरेच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. विटा व परिसरातील मान्यताप्राप्त आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव एफ सी सेंटर असल्याने यावर्षीच्या प्रवेशाच्या डी टी ई नियमावली व वेळापत्रकासहित चर्चा तहसिलदार यांच्याबरोबर केली असून विद्यार्थी विद्यार्थीनी यांना वेळेत सर्व दाखले मिळाले तर प्रवेश करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थीनी यांना अडचण राहणार नाही. प्रवेश प्रक्रियासंबंधित विद्यार्थी यादी आम्हाला आमच्या पुर्ण प्रक्रियेसहित मिळाली तर नक्कीच सर्व दाखले आम्ही वेळेत उपलब्ध करून देऊ असे तहसिलदार यांनी सांगितले. विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना वेळेत दाखले मिळाले तर परिसरातील १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनी यांचे नुकसान होणार नाही व ते कोणत्याही प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाहीत असे मत प्राचार्य डॉ. महाडीक यांनी व्यक्त केले