२० पॉझिटिव्ह,२१ कोरोनामुक्त!

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.२४/०६/२०२१ 

मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २४ जून रोजी तालुक्यात नव्याने २० लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,तर २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १५ पुरुष असून ५ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १८ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील १८ व तालुक्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२४ जून,२०२१)

आटपाडी 1
आंबेवाडी 1
गोमेवाडी 1
दिघंची 6
घाणंद 2
कौठुळी 1
लिंगीवरे 2
पिंपरी बु 2
खरसुंडी 1
शेटफळे करगणी 1
महुद 1
खवासपूर 1