१४ पॉझिटिव्ह,२६ कोरोनामुक्त !

*आटपाडी तालुका : कोरोनायन*  दि.२३/०६/२०२१  मोहनराव पुजारी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:

आटपाडी तालुक्यात आज दि. २३ जून रोजी तालुक्यात नव्याने १४ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर २६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये ६ पुरुष असून ८ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ९ व तालुक्याबाहेरील ५ व्यक्तींचा समावेश आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यात यश येत आहे.

आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२३ जून,२०२१

आटपाडी 1
दिघंची 2
लिंगीवरे 1
यपावाडी 1
उंबरगाव 2
गळवेवाडी 2
कराड 1
कटफळ 3
खवासपूर 1