अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
अमित (बंटीदादा ) दुधाळ यांचा सत्कार जत शहरातील मुख्य राजवाडा चौकात एस.टी.कामगार सेनेच्यावतीने करण्यात आला.त्यांची जत तालूका शिवसेना संघटक म्हणून नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने दिवाकर रावते (शिवसेना संपर्क प्रमुख ),नितीन बानुगडे पाटील (शिवसेना सहसंपर्क प्रमुख ) यांच्या सुचनेने जिल्हा प्रमुख आनंद (बापु) पाटील , संजय विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालूका शिवसेना संघटक म्हणून अमित (बंटीदादा) दुधाळ यांची निवड करण्यात आल्याचे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना मधुन प्रसिद्ध करण्यात आले.त्यामुळे जत एस.टी.आगारातील पदाधिकारी यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन शहरातील राजवाडा चौकात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आगारातील जेष्ट नेते पी.टी.मदने,महेश पाटील तसेच आगार अध्यक्ष बळीराम यादव व सचिव पोपट शिंदे व सहकारी हमीद मुल्ला, युवासेनेचे रोहितदादा पाचंगे (जत शहर सरचिटणीस) , ज्ञानेश्वर धुमाळ (जत शहर प्रमुख ) इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन