अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
शिवसेनेच्या जत तालुका प्रमुखपदी (पश्चिम) माजी सभापती संजय सावंत तर शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कै.बाबुराव दुधाळ यांचे चिरंजीव अमित उर्फ बंटी दुधाळ याची तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आले आहे. संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून बनाळी ते पंढरपूर पायी दिंडी काढली होती.तसेच बंटी दुधाळ हे युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत होते. नूतन पदाधिकारी म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती समर्थपणे पार पाडू. जत तालुक्यात शिवसेना बळकट करणार असून गाव तिथे शिवसेनेच्या शाखा काढणार असल्याचे नूतन तालुका प्रमुख संजय सावंत व बंटी दुधाळ म्हणाले.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन