अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
कोव्हीड 19च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेली सव्वा वर्षे अतोनात हाल झाले आहे. त्यात बऱ्याच कंपनी बंद झाल्या तर काही कंपनीमध्ये कामगार कमी (कपात)करण्यात आले आहे.त्यातही गगनाला भिडणारी महागाई यामुळे सर्व जनता आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरता येईल, मुला बाळांना व वयस्कर लोकांना जपणे व सांभाळणे सध्या जिकरीचे झाले आहे. त्यात लोकांना काम नाही ज्यांना आहे त्यांच्या पगारामध्ये कंपनीने कपात केलेली आहे.अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस,खाद्य तेल व इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू महाग केलेल्या आहेत.तरी जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेस दिलासा द्यावा अन्यथा येत्या काळात संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाउपाध्यक्ष सतीश क्षीरसागर, जत तालुका प्रमुख संजय कांबळे, तालुकाध्यक्ष अमोल साबळे, तालुकाउपाध्यक्ष विठ्ठल पुजारी (जि .प. गट जाडरबोबलाद) जत तालुका कमिटी सदस्य अशोक कांबळे, नाना वाघमारे, पृथ्वीराज वाघमारे, ज्योतिराम पवार, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन