अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
बिरनाळ येथे महाराष्ट्र कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यामध्ये रोहित पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची महाराष्ट्र कामगार सेना उत्तर विभाग, जत शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.त्यांना तसे लेखी पत्र देवून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्य प्रवक्ते दिनकर पतंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जुने आणि नवीन शिवसैनिक यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांची कामे करावीत व त्यांना दिलासा द्यावा असे प्रतिपादन दिनकर पतंगे यांनी केले. महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके यांनी सर्वांचे स्वागत केले. रोहित पवार म्हणाले, पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती मी सक्षमपणे पार पाडेल. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र राहून पक्षाचे काम करेन. आगामी येणारा सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकतीने लढवू असा विश्वास व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रभाग क्रमांक आठचे शाखाप्रमुख अब्बास मुजावर,युवा सेना जत शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ,सरचिटणीस रोहित पाचंगे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन